कोरोनाच्या संकटकाळात अडचणीत आलेल्या ठेकेदारांना थकित देयके त्वरीत द्यावी
अहमदनगर : अहमदनगर महापालिकेकडून सन 2017-18 मधील विविध विकास कामाचे देयके मिळण्याच्या मागणीसाठी अहमदनगर महानगरपालिका ठेकेदार संघटनेच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले.
देयके मिळण्यासाठी ठेकेदार संघटनेच्या पदाधिकारी यांनी पाठपुरावा करुन देखील अनेक वेळा सविस्तर चर्चा होऊनही मनपा प्रशासनाकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ होत असल्याचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी ठेकेदार संघटनेचे शहानवाज शेख, मोसिन शेख, सचिन सापटे, सचिन गाले, शोहेब शेख, मुज्जू कुरेशी, संजू डुकरे आदी उपस्थित होते. अहमदनगर महानगरपालिकेचे ठेकेदार संघटनेच्या पदाधिकार्यांनी यापूर्वी आयुक्त यांना थकित देयके मिळण्यासाठी दोन वेळेस निवेदन दिले होते. तरी देखील कुठल्याही प्रकारचे देयके अद्यापि मिळाले नाही.
नगर शहरामध्ये विविध विकास कामे ठेकेदारांनी सन 2017-18 या आर्थिक वर्षात पुर्ण केले आहे. या कामाची बीले लेखा विभागाकडे जमा आहेत. नगरसेवक निधी सन 2016- 17 या आर्थिक वर्षात सर्व कामाची देयके ठेकेदारांना देण्यात आली होती. परंतु सन 2017-18 या चालू आर्थिक वर्षात नगरसेवक स्वच्छ निधीचा पूर्वी ठराव झाल्याप्रमाणे देयके दिले जात नाही.