कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काल IMA, Physician, Radiologist, Ayurved यांच्या प्रतिनिधी सोबत बैठक घेतली.

817

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काल IMA, Physician, Radiologist, Ayurved यांच्या प्रतिनिधी सोबत बैठक घेतली.

यामध्ये रुग्णांच्या उपचारपद्धतीवर चर्चा करून रुग्णांकडे सेवाभावने बघून कार्य करण्याचे निर्देश दिले.

कुठल्याही व्यक्तीचा सिटीस्कॅन करण्यासाठी त्याच्या आरटीपीसीआर चाचणीचा आहवाल पॉझिटिव्ह असायला हवा असे सक्तीचे आदेश त्यांनी यावेळी दिले.

फिजिशियन यांनी लिहून दिल्याशिवाय कुठल्याही रुग्णावर रेमडीसीवीर इंजेक्शनचा वापर न करण्याच्या कडक सूचना त्यांनी केल्या.

कोरोना रुग्णांच्या मृत्यू संदर्भात हॉस्पिटलचे डेथ अन्यालिसिस करण्यासंदर्भात त्यांनी सूचना केल्या.

ऑक्सिजन वाया जाऊ नये म्हणून त्याचा वापर अजून सतर्कतेने करण्यास त्यांनी सांगितले.

यावेळी मनपा आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर, आयएमएचे डॉ. व्हि रंजलकर, डॉ. यशवंत गाडे, निमाचे डॉ. गिरीश डागा, डॉ. प्रवीण बेरड, डॉ. विजय चौधरी, रेडीओलॉजिस्ट संघटनेचे डॉ. शरद कोंडेकर यांच्यासह सर्व संबधिंत उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here