कोरोनाच्या दुसर्‍या लाटेला भाजप जबाबदार होताच आणि आता तिसर्‍या लाटेलाही भाजप कारणीभूत ठरणार आहे – नवाब मलिक

695

निवडणूका येत – जात राहतील परंतु लोकांचे जीव महत्वाचे…

मुंबई दि. २० ऑगस्ट – जनआशिर्वाद यात्रेच्या निमित्ताने भाजप निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. देशभर यात्रेच्या नावाखाली गर्दी जमवली जात आहे. दुसऱ्या लाटेच्यावेळी निवडणुकीसाठी अफाट गर्दी जमवल्याने हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला याला भाजप कारणीभूत होती ही सत्य परिस्थिती आहे अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

आयसीएमआर आणि डब्ल्यूएचओ व या क्षेत्रातील विविध तज्ज्ञांनी गर्दी टाळली नाही तर तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली आहे. मात्र जनआशिर्वाद यात्रेच्या निमित्ताने भाजप गर्दी जमवत आहे. राज्यातही राजकीय कार्यक्रम होत आहेत. या राजकीय कार्यक्रमामुळे तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण होत आहे. राज्यसरकारने तयार केलेल्या नियमांचे उल्लंघन होत असेल तर निश्चितरुपाने गुन्हा दाखल करुन कारवाई होणार आहे असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

निवडणूका येत – जात राहतील परंतु लोकांचे जीव महत्त्वाचे आहेत हे भाजपच्या लोकांना कळले पाहिजे असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here