कोरेगाव भीमा दंगलीच्या खटल्यातून संभाजी भिडेंचे नाव वगळले
ठाण्यातील वकील आदित्य मिश्रा यांनी संभाजी भिडे यांच्याशी संबंधित प्रकरणाची सुनावणी होत नसल्याचे सांगत त्यातून यांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्याची तक्रार आयोगाकडे केली होती.
त्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान संभाजी भिडे यांचा भीमा कोरेगाव दंगल प्रत्यक्ष संबंध आढळून येत नसल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचं नाव खटल्यातून वगळण्यात आल्याचं लेखी अहवाल दिला आहे.
पुणे ग्रामीण पोलिसांनी राज्य मानवी हक्क आयोगाला दिली माहिती.या दंगलीमध्ये भिडे यांचा हात असल्याची तक्रार शिक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये नोंदवण्यात आली होती.
पुणे: ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान’चे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांचे नाव कोरेगाव भीमा दंगलीच्या खटल्यातून (Koregaon Bhima Case) वगळण्यात आल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांनी राज्य मानवी हक्क आयोगाला दिली आहे.
या दंगलीमध्ये संभाजी भिडे यांचा हात असल्याची तक्रार शिक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये नोंदवण्यात आली होती. या प्रकरणात एकूण २२ गुन्हे दाखल असून ४१ आरोपींवर वर्षभर पूर्वीच आरोपपत्र दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये संभाजी भिडे यांचे नाव नसल्याची माहिती पोलिसांनी राज्य मानवी हक्क आयोगा समोर असलेल्या सुनावणीदरम्यान दिले आहेत.
ठाण्यातील वकील आदित्य मिश्रा यांनी संभाजी भिडे यांच्याशी संबंधित प्रकरणाची सुनावणी होत नसल्याचे सांगत त्यातून यांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्याची तक्रार आयोगाकडे केली होती.
त्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान संभाजी भिडे यांचा भीमा कोरेगाव दंगल प्रत्यक्ष संबंध आढळून येत नसल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचं नाव खटल्यातून वगळण्यात आल्याचं लेखी अहवाल दिला आहे