कोयता गँगची दहशत; एकावर कोयत्याचे वार

    519

    गुरुवारी पहाटे सुपा येथील पान दुकानावर पुणे येथील कैफ मन्यार व त्याच्या सहकार्यानी कोयते उडवत पान दुकानाची मोडतोड केली व एकाला कोयता मारुन जखमी केले. सुपा पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.

    याबाबत समीर जब्बार सय्यद (रा. सुपा) यांनी सुपा पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, गुरुवारी पहाटे दोन वाजनाच्या सुमारास अहमदनगर-पुणे महामार्गावर दरवेश हाँटेल जवळील हिरा मोती पान दुकानाजवळ काही तरुण थांबले व ते तेथे जवळच लघु संका करु लागले.

    सुप्यात कोयता गँगची दहशत; एकावर कोयत्याचे वार
    खा. विखेंसमोरच कार्यकर्त्यांचा तुफान राडा; श्रीगोंद्यात नेमकं काय घडलं?
    तेव्हा पान दुकानावरील समीर सय्यद व साजित शेख यांनी त्यांना तुम्ही येथे लघुशंका करु नका तेथे समाज मंदीर आहे .तेव्हा तेथे ते प्रवासी युवक व स्थानिक युवक याच्यात बाचाबाची झाली. त्यावेळी ते प्रवाशी युवक शिवीगाळ करत पुण्याच्या दिशेने निघुन गेले व अर्ध्या तासाने पुणे जिल्ह्यातील गुन्हेगार कैफ मन्यार हा आपल्या सहकार्यासह तेथे आला.

    तेव्हा त्याच्या जवळ कोयता लाकडी दांडके होते, आल्यानंतर त्यांनी पान दुकानात तोडफोड केली व दुकानातील समीर सय्यद व साजित शेख यांना हाणमार केली. घटनेची माहिती कळताच सुपा पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक नितीनकुमार गोकावे यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलिसांचे पथक घटना स्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी साजित शेख यास स्थानिकाच्या मदतीने जवळील खाजगी रुग्णालयात दाखल केले.

    सुप्यात कोयता गँगची दहशत; एकावर कोयत्याचे वार
    राहुरी, श्रीरामपूरच्या आकाशातून रात्रीच्या अंधारात नेमकं काय गेलं?…. नागरिकांनी अनुभवले अनोखे दृष्य
    सुपा पोलिसांनी तात्काळ मोर्चा पुण्याच्या दिशेने वळवला व या घटनेतील मुख्य आरोपी कैफ मन्यार यास रांजणगाव गणपती येथे अटक केली. त्यास रात्रीच सुपा पोलिस स्टेशनला हजर केले. समीर सय्यद यांच्या फिर्यादीवरुन सुपा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

    सुप्यात कोयता गँगची दहशत; एकावर कोयत्याचे वार

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here