कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या छेडछाडीच्या प्रकरणात आरोपी बाळ जगन्नाथ बोठे याने जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. जिल्हा व सत्र न्यायालयात दि. 29 नोव्हेंबर रोजी बोठेने अॅड एस बी दुसिंग यांच्या वतीने अर्ज दाखल केला आहे.आरोपी बाळ बोठे हा सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी आहे. 30 नोव्हेंबर 2020 रोजी रेखा जरे यांची हत्या झाली. या हत्येचा मास्टरमाईंड म्हणून बाळ बोठेचे नाव समोर येताच तो फरार झाला होता. आरोपी बोठे फरार असताना त्याच्याविरोधात शहरातील कोतवाली पोलिस ठाण्यात छेडछाड केल्याप्रकरणी भादंवि. कलम 354 ड प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. रेखा जरे यांच्या हत्येनंतर बोठे तब्बल 102 दिवस फरार होता. हैद्राबादच्या बिलालनगर परिसरात बोठे लपून बसला होता. त्याला अटक करण्यात आल्यानंतर जरे हत्येप्रकरणी तो पोलिस कोठडीत होता. त्यानंतर त्याला छेडछाडीच्या प्रकरणात वर्ग करून पोलिस कोठडी मिळाली होती. सध्या आरोपी बोठे पारनेर येथे न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने न्यायालयीन कोठडीत असतानाच जरे हत्याप्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज केला. जिल्हा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याने औरंगाबाद खंडपीठात जामीनासाठी अर्ज केला आहे. तर 29 नोव्हेंबर रोजी त्याने छेडछाडप्रकरणात जामीनासाठी दाखल केला आहे. या अर्जावरील सुनावणी ही श्रीमती एम व्ही देशपांडे जिल्हा न्यायाधीश -२ व अति.सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयामध्ये आहे. दरम्यान न्यायालयाने सरकारी पक्ष आणि पोलिसांचे म्हणणे मागितले होते; मात्र, पोलिसांनी म्हणणे सादर न केल्याने सोमवारी याप्रकरणाची सुनावणी होणार आहे.
ताजी बातमी
ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाची...
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला असून, जे नागरिक...
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
चर्चेत असलेला विषय
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांची गळा कापून हत्या
नगर शहरात सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी महिला रेखा जरे यांची पारनेर तालुक्यातील जातेवगाव घाटात...
सरपंच पतीं’वर कारवाईचा बडगा… केंद्र सरकार ‘हे’ पाऊल उचलणार…
पुणे : अनेक ग्रामपंचायतमध्ये महिला सरपंच निवडून येतात. मात्र, त्यांना कारभार करता येत नाही. बऱ्याच ठिकाणी महिलेऐवजी...
अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रस्तावित नविन पोलीस ठाणे निमिर्ती
कोणत्या तालुक्यात व गावात होणार नवीन पोलीस ठाणे खालील प्रमाणे :-
...
शेतकरी, घरकुल लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, गौण खनिज मोफत दिले जाणार
राज्य सरकारने शेतकऱ्यांना विहीर बांधकामासाठी आणि घरकुल लाभार्थ्यांना आवश्यक असलेल्या दगड, माती, मुरूम यासारख्या गौणखनिजांचा विनामूल्य पुरवठा...




