कोणी तरी कोरोणाची लस बनवा बाबा नाहीतर …

    781

    कोणी तरी कोरोणाची लस बनवा बाबा नाहीतर …

    मुंबई | कोरोनामुळे देशात लॉकडाऊनच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यावेळी जवळ जवळ घरात तीन महिने सर्वजण बसून होते. त्यानंतर टप्याटप्याने सर्व काही चालू होत गेलं. मात्र अजूनही कोरोनाची लस आली नाही आणि कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लागली आहे.

    कोरोनावर मात केल्यावरही पंधरा दिवस क्वारंटाईन केलं जातं. त्यामुळे या सगळ्याला सर्वच वैतागले आहेत. अशातच अभिनेत्री मलायका अरोरालाही कोरोना झाला आहे. तिलासुद्धा क्वारंटाईन करण्यात आलं आहे. मात्र या सगळ्याला मलायका चांगलीच संतापली आहे.

    कोणी तरी कोरोणाची लस बनवा बाबा नाहीतर माझी जवानी अशीच निघुन जाईल, अशी पोस्ट इन्स्टाग्रामवर मलायकाने केली आहे. मलायकाचा हा कॉमेडी अंदाज सोशल मीडियावर नेटकऱ्यांना चांगलाच पसंत पडला आहे.

    दरम्यान, अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा व्यतिरिक्त जेनेलिया देशमुख, आफताब शिवदासानी, किरण कुमार, करीम मोरानी, कनिका कपूर, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय- बच्चन आणि आराध्या बच्चन यांनाही करोनाची लागण झाली होती.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here