कोंबड्यांची झुंज लावून पैश्यात हरजीत खेळणा-यांवर पोलिसांची कारवाई

450
  • पाथर्डी- शहरानजिक असणा-या माळीबाभूळगाव शिवारात कोंबड्यांची झुंज लावून त्यावर पैश्यात हरजीत खेळावर पाथर्डी पोलिसांनी रविवारी (दि.१६) सायंकाळी ५ वा.दरम्यान छापा टाकून तिघांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित १० ते ११ जण फरार झाले आहेत.
  • पाथर्डी पोलीस ठाण्याचे पो.नि सुहास चव्हाण यांच्या सूचनेनुसार सपोनि पाटील व पोकाॅ तानाजी सानप आदिंनी ही कारवाई केली आहे.
  • खेळणा-यांपैकी उर्वरित फरार झालेल्या तिघासह ११ ते १४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, घटनास्थळी पकडण्यात आलेल्या तिघांकडून १ लाख ६४ हजार १४० रुपयांचा मुद्दे माल जप्त करण्यात आला आहे. यात जप्त करण्यात आलेल्या कोंबड्याचा पंचासमक्ष पाथर्डी पोलिसांनी लिलाव केला, या लिलावात बोली लावून तो कोंबड्याचा लिलाव ५ हजार १०० रुपयांचा झाला.
  • करीम सय्यद सय्यद (वय २३, रा.अंगूरीबाग मोढारोड, औरंगाबाद), अनिस रफीक शेख (वय ३४ रा.लक्कडकोट, येवाला,ता.येवाला जि.नाशिक), ओंकार कैलास चव्हाण (वय २९, रा.गणेशपेठ पुणे, ता.जि.पुणे) अशी पकडण्यात असलेल्यांची नावे आहेत. पंचासमक्ष पकडण्यात आलेल्यांकडून कोंबड्यासह रोख रक्कम, दुचाकी व मोबाईल असा एकूण १ लाख ६४ हजार १४० रुपयांचा मुद्दे माल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोकाॅ सागर मोहिते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात ११ ते १४ जणांविरुध्द भादंवि कलम १८८,२६९,२७० सह मुं.जु.का कलम १२(ब)महा.कोविड अधि.२०१९ चे कलम ११ भारतीय साथरोग अधि कलम २,३,४ प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here