*केसगळतीवर हे घरगुती उपाय ठरतील रामबाण, लगेच करुन पाहा..!*

_*केसगळतीवर हे घरगुती उपाय ठरतील रामबाण, लगेच करुन पाहा..!*_ ऐन तारूण्यात होणाऱ्या केस गळतीमुळे अनेकांची झोप उडते. केसगळतीसाठी आहाराला वा वाढत्या वयाला जबाबदार धरले जाते. अनेकदा भरमसाठ पैसे खर्चून उपाययोजना केल्या जातात. पण, त्यानेही फारसा फरक पडत नाही. अशा वेळी काही घरगुती उपायही केसगळती थांबवू शकतात. *कांद्याचा रस* – कांद्यातील सल्फर केसांच्या वाढीसाठी मदत करते. कांद्याचा रस टाळूवर १५ मिनिटांसाठी लावून ठेवा. नंतर सौम्य शाम्पूने केस धुवा व ते वाऱ्यावर सुकू द्या. आठवड्यातून दोनदा हा उपाय करावा. *नारळाचे दूध वा तेल* – नारळातील मेद, प्रोटिन्स व मिनरल्स केस तुटण्याचे प्रमाण कमी करतात. केस गळती रोखण्यासाठी नारळाचे दुध वा तेल अतिशय उपयुक्त ठरते. *हीना* – केसांना नैसर्गिक रंग देण्यासाठी ‘हीना’ वापरला जातो, मात्र मूळापासून केस घट्ट करण्याची क्षमतासुद्धा हीनात आहे.*जास्वंदाची फुले*- काही जास्वंदाची फुले कुटून तीळ वा खोबरेल तेलात मिश्रण करा. ते काही तासांसाठी केसांना लावून ठेवा. थंड पाणी व सौम्य शाम्पूने केस धुवा. *आवळा* – यातील व्हिटामिन ‘सी’ व एन्टीऑक्सिडन्ट केसगळती थांबवते. आवळ्याचा अर्क वा पावडर लिंबाच्या रसात एकत्र करा. हे मिश्रण केसांना लावून सुकू द्या. नंतर कोमट पाण्याने केस धुऊन टाका.*अंडी* – अंड्यातील अनेक घटक केस गळतीवर किफायतशीर आहेत. त्यातील सल्फर, फॉसफरस , आयोडीन, झिंक घटक केसांच्या वाढीस मदत करतात.?? *(केस गळतीवरील घरगुती उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.)*➖➖

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here