केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे निधन

केंद्रीय मंत्री आणि लोकजनशक्ती पार्टीचे नेते रामविलास पासवान यांचे निधन झाले आहे. रामविलास पासवान हे लोकजनशक्ती पार्टी (लोजपा) चे राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्यांच्या पक्ष केंद्रातील मोदी सरकारमध्ये सहभागी आहे. नवी दिल्ली : गेली पाच दशकं भारतीय राजकारणात आपल्या कर्तृत्वाचा अमिट ठसा उमटविणारे आणि राजकीय हवेचा अचूक अंदाज हेरणारे मुरब्बी राजकारणी, लोक जनशक्ती पार्टीचे सर्वेसर्वा आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचं आज दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या ७४व्या वर्षी त्यांनी दिल्लीच्या एस्कॉर्ट रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ७४व्या वर्षी त्यांनी दिल्लीच्या एस्कॉर्ट रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. पासवान यांचे पुत्र चिराग पासवान यांनी याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे.पासवान यांच्या जाण्याने भारतीय राजकारणातील संघर्षशील नेता गमावल्याची भावना व्यक्त होत आहे. रामविलास पासवान यांच्या ह्रदयाची शस्त्रक्रिया काहीच दिवसांपूर्वी करण्यात आली होती. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते त्यांच्या निधनानंतर “बाबा…. तुम्ही आता या जगात नाहीत, पण मला माहिती आहे की तुम्ही जिथेही असाल माझ्यासोबत नेहमी असाल”, असं भावनिक ट्वीट चिराग पासवान यांनी केलं. बिहारच्या राजकारणात रामविलास पासवान यांचा मोठा दबदबा आहे. पासवान यांनी 1960 च्या दशकात राजकारणाची सुरुवात केली. पहिल्यांदा आमदार राहिलेल्या पासवान यांनी हाजीपूर मतदारसंघातून ४ लाख मतांनी विजय मिळवला होता. त्यामुळे ते देशभर चर्चेत आले होते. 1989 मध्ये विजयी झाल्यानंतर ते पहिल्यांदा व्ही. पी. सिंह यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहिले. त्यानंतर ते एच. डी. देवेगौडा यांच्या सरकारमध्ये मंत्री झाले. गुजराल सरकारमध्ये ते रेल्वेमंत्री झाले. केंद्रात सरकार कोणत्याही पक्षाचे असले तरी रामविलास पासवान हे केंद्रीय मंत्री असतात असा त्यांचा आजपर्यंतचा प्रवास आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here