केंद्रीय मंत्री रामदास आठवले थेट हाथरसमध्ये,पिडीतेच्या कुटुंबीयांची घेतली भेट

हाथरस- केंद्रीय मंंत्री रामदास आठवले यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. ते स्वत: हाथरस या गावी गेले आणि आरपीआय या आपल्या पक्षाकडून त्यांनी पीडित कुटुंबीयांना 5 लाखांची मदतही केली. हाथरस प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्रातही दिसून आले होते. त्यामुळे त्यांनी थेट हाथरसला जावून कुटुंबीयांना आधार दिला.
पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत असं आश्वासन त्यांनी कुटुंबीयांना दिलं. या भेटीनंतर आठवले यांनी स्थानिक अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली.
आठवले यांनी कंगणा राणौत आणि पायल घोष या अभिनेत्रींना पाठिंबा दिला होता. त्यामुळे आता आठवले कुठे आहेत, ते हाथरसला का जात नाही  अशीही टीका विरोधकांकडून करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here