केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माहीतीनुसार..

    186

    ट्रक चालकांसाठी कामाचे तास निश्चित करण्यासाठी कायदा आणला जाणार आहे. रस्ता सुरक्षा सप्ताहादरम्यान, 4 तासांच्या टेलिथॉन आणि ‘रस्ते सुरक्षा अभियान’ जनजागरूकता मोहिमेमध्ये ते सहभागी झाले होते. ट्रक चालकांच्या कामाचे तास निश्चित करण्यासाठी देशात लवकरच कायदा आणला जाईल, असं त्यांनी सांगितले.

    मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या या माहितीनुसार, ट्रक चालकांचे हा कायदा आणल्याने कामाचे तास निश्चित होणार आहेत, ज्यामुळे रस्त्यांवर अपघातांचे प्रमाण कमी होईल. यासोबतच कोणालाही जास्त काम करावे लागणार नाही. देशभरात होणाऱ्या रस्ते अपघातांना आळा बसल्याने मोठे अपघात होण्याची संख्या कमी होईल.

    “रस्ते मंत्रालयाकडून देशात होणारे रस्ते अपघात कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. रस्ते अपघात 2025 च्या अखेरपर्यंत 50 टक्क्यांनी कमी करण्याचं मंत्रालयाचं उद्दिष्ट आहे. रस्ते अपघात कमी करण्यासाठी रस्ते मंत्रालय कटिबद्ध आहे आणि रस्ते सुरक्षामध्ये अभियांत्रिकी, अंमलबजावणी, शिक्षण आणि आपत्कालीन क्षेत्र या अंतर्गत अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत”, असं देखील गडकरी म्हणाले.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here