कुस्तीप्रेमींनो… 66 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची अखेर घोषणा; कधी अन् कुठे रंगणार थरार?

    119

    कुस्तीप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघातर्फे घेण्यात येणाऱ्या 66 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेबाबत घोषणा करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षीची कुस्ती स्पर्धा पुणे जिल्ह्यातील वाघोली लोणीकंद जवळ फुलगाव येथे रंगणार आहे. ही स्पर्धा 1 ते 7 नोव्हेंबर दरम्यान नेताजी सुभाषचंद्र बोस शाळेच्या मैदानावर होणार आहे. घोषणा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस यांनी केली आहे. महत्वाच म्हणजे या स्पर्धेसाठी देशाचे गृहमंत्री अमित शाह तसेच राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व राष्ट्रीय कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष बृजभूषण सिंह उपस्थित राहणार आहेत. यामध्ये 47 संघातील 900 हून अधिक मल्ल सहभागी होणार आहेत.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here