किरण काळेनी काँग्रेसपक्ष व पक्ष नेतृत्वाची जाणीवपूर्वक बेईज्जती केली.

    262

    किरण काळेनी काँग्रेसपक्ष व पक्ष नेतृत्वाची जाणीवपूर्वक बेईज्जती केली. “बाळासाहेब भंडारी.(मार्गदर्शक अहमदनगर शहर जिल्हा युवककाँग्रेस) अहमदनगर ग्रामीण व शहर जिल्हाध्यक्षांनी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष मा.
    कुणालजी राऊत यांच्या उपस्थितीत अहमदनगर जिल्ह्यातील युवक काँग्रेस संघटनेची आढावा बैठक ( जाहीर मेळावा नव्हे )जाहीर करण्यात आली होती व त्यासाठी 13 विधानसभा अध्यक्ष, भिंगार अध्यक्ष, ग्रामीण जिल्हा व शहर जिल्हा कार्यकारिणीस तसे युवक काँग्रेस ला मार्गदर्शन व सहकार्य करणारे दिप चव्हाण, बाळासाहेब भंडारी,खलीलभाई सय्यद व जिल्ह्यातील प्रदेश युवक पदाधिकारी इ.मर्यादित पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले होते सदर बैठकीच्या निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष मा.श्री. कुणालजी राऊत यांचे स्वागताचे अहमदनगर शहर जिल्हा युवक काँग्रेस व श्रीरामपूर युवक काँग्रेस च्या वतीनेच अधिकृत स्वागताचे फ्लेक्स लावण्यात आले होते.सदर फ्लेक्स वर पार्टी प्रोटोकॉलनुसार नेते मंडळीचें फोटो टाकण्यात आले होते.सदर दोन्ही अधिकृत स्वागत फलकांवर कोठेही आ.सत्यजीत तांबे यांचा फोटो नाही .(सोबत दिलेले अधिकृत फलकांचे फोटो पहा)परंतू किरण काळेंनी कोणतीच शहानिशा न करता केवळ ऐकीव माहितीवर बेजाबदारपणे गैरकायद्याची मंडळी गोळा करुन आमंत्रित नसतांनाही चालु आढावा बैठकीत जबरदस्तीने प्रवेश करून धुडगूस घालण्यास सुरुवात केली तसेच अर्वाच्य भाषेत आरडाओरड करून युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्षांशी वाद घालण्यास सुरुवात केल्यावर सर्व जिल्हाभरातून बैठकीस आलेल्या युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून त्याला विरोध करण्यात आला परंतु ऐकण्याच्या मनस्थितीत नसलेल्या किरण काळेला कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांकडून शेवटी चलेजावच्या घोषणांमध्ये बोलण्यास मज्जाव करण्यात येवुन बैठकीबाहेर काढण्यात आले.वास्तविक आमंत्रित नसताना बैठकीत प्रवेश करण्याचे कारणच नव्हते.कहर म्हणजे स्वतःलाच युवक काँग्रेस नियुक्तीबद्दल कोणतेही अधिकार नसताना कोणा प्रवीण गितेला स्वयंघोषित अहमदनगर शहर जिल्हा युवककाँग्रेस अध्यक्ष म्हणून घोषित केले.महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्षांचे अधिकृत अधिकार डावलून बेकायदेशीर नियुक्ती करण्याचे कारणच नव्हते.तेव्हाच मा.महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्षांनी स्वतःहून मोसीन शेख हेच अधिकृत अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष असल्याचे जाहीर केल्यानंतर अजुनच बिथरुन किरण काळेनी अरेरावी करत ऐकेरी भाषेत उपस्थितांचा उल्लेख करुन पक्षप्रतिमा मलीन केलेली असुन संपूर्ण अहमदनगर शहर व जिल्ह्य़ात पक्षाची बदनामी होवून चुकीचा मेसेज गेला आहे.सदर घटनेमुळे पहिल्यांदाच नगर जिल्ह्य़ात दौऱ्यावर आलेल्या महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्षांना शरमेने खाली मान घालावी लागली.ह्या सर्व जाणीवपूर्वक घडलेल्या गैरप्रकारांना जबाबदार असणाऱ्यां किरण काळेंची अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष पदावरून तात्काळ उचलबांगडी करण्याची मागणी मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष व अहमदनगर जिल्ह्याचे पक्षप्रमुख ना.श्री.बाळासाहेबजी थोरात यांचेकडे करत आहे. बाळासाहेब भंडारी.अहमदनगर जेष्ठ काँग्रेस पदाधिकारी अहमदनगर.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here