काही ‘पाहुणे’ माझ्या घरी येणार, चहा, कुकीजसह स्वागतासाठी तयार, नवाब मलिकांचं ट्वीट

611

Nawab Malik Tweet : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik)यांनी ट्विट करत काही ऑफिशल पाहुणे आज सकाळी माझ्या घरी अचानक येणार आहे असं म्हणलं आहे. या पाहुण्यांचं मी चहा बिस्कीट देऊन मोठ्या मनाने आदरातिथ्य करेन. त्यांना योग्य पत्ता हवा असेल तर मला फोन करावा असंही त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

नवाब मलिक (Nawab Malik) यांना पुन्हा एकदा धमकीचं पत्र मिळालं आहे. या पत्रात त्यांना जीवे मारण्याच्या धमकीसह कुटुंबातील महिलांवर बलात्कार करण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकीचं पत्र लिहिणाऱ्याने स्वतःला नौदलात कर्नल असल्याचं सांगितलं आहे. मलिक यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB)चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर सातत्याने आरोप केल्याने आपण पत्र लिहीत असल्याचा उल्लेख देखील या पत्रात करण्यात आला आहे.  “समीर वानखेडे यांची माफी मागितली नाही तर मलिक यांच्या घरावर हल्ला करणार असल्याचा इशारा या पत्रातून दिला गेला आहे.

या संपूर्ण प्रकरणी आपण गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांना पत्र लिहून या पत्राची चौकशी करण्याची मागणी करणार असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली होती. हे पत्र अभिजित बनसोडे नावाच्या व्यक्तीने कफ परेड मुंबई येथून लिहिलं असल्याचं म्हटलं होतं. या संपूर्ण प्रकरणावर बोलताना नवाब मलिक यांनी म्हटलं होतं की, “आपण अशा धमक्यांना घाबरत नाही. मागे देखील अशाप्रकारच्या धमक्या मला फोनवरून आल्या होत्या. परंतु यातील एकाही धमकीला आपण घाबरलेलो नाही आणि घाबरणार नाही.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here