
शिंदे-फडणवीस विमानाने दिल्लीला उड्डाण केल्यानंतर राज्यातील पडद्यामागील मोठ्या घडामोडींना सुरुवात झाली आहे. कारण त्यानंतर लगेच अजित पवार गट नेत्यांनी देवगिरीच्या दिशेने कूच करण्यास सुरुवात केली होती. तिथे जोरदार खलबते झालीत. अजित पवार यांच्या निवासस्थानी पवार गटाच्या मंत्र्यांची बैठक झाली. अजित पवारांना जर बरेच नाहीय तर मग हे नेते तिथे का जमले आहेत, असा सवाल आता जनतेला पडू लागला आहे.भुजबळ यांना देवगिरी येथे पत्रकारांनी घेराव घातला आणि ही बैठक आधीच ठरल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले. अजित पवार यांना घशात इन्फेक्शन झाल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे अजित पवार मंत्रिमंडळाच्या बैठकीला आले नाहीत.. आमची बैठक देवगिरी येथे आधीच ठरली होती. प्रफुल्ल पटेल या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. अजित पवार यांना शारीरिक आजार आहे बाकी कोणताही राजकीय आजार नाही असे भुजबळ म्हणाले.अजित पवार दिल्लीत होणाऱ्या जीएसटी काऊन्सिलच्या बैठकीला जाणार होते. ही बैठक ७ ऑक्टोबरला होणार आहे. मात्र, त्या बैठकीला देखील ते दिल्लीला जाणार नसल्याचे समजते आहे. यामुळे नक्कीच काहीतरी बिनसल्याचा अंदाज कार्यकर्ते लावू लागले आहेत.




