कार पुलावरून थेट खाली कोसळत भीषण अपघात

कार पुलावरून थेट खाली कोसळत भीषण अपघात

भीषण अपघात !

भाजप आमदाराच्या मुलासह सात विद्यार्थ्यांचा मृत्यू सदर अपघात वर्ध्यामध्ये झाला.

भाजप आमदाराच्या मुलासह सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.

या अपघातामध्ये ज्या सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला ते मेडीकलचे शिक्षण घेत होते.

या मृतांमध्ये भंडाऱ्याचे भाजप आमदार विजय रहांगदळे यांचा मुलगा आविष्कार रहांगदळे याचाही समावेश असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

यामुळे रहांगदळे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

भाजप आमदार विजय रहांगदळे हे भंडारा जिल्ह्याचे आमदार आहेत.हा अपघात भीषण होता.

तब्बल चार तास मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरु होतं. कारमधील एकाचाही या अपघातात जीव वाचू शकलेला नाही.

सावंगीच्या मेडीकल कॉलेजमध्ये शिक्षण घेणारी मुलं कारद्वारे देवळीहून वर्ध्याकडे येत होती. सोमवारी रात्री एकच्या सुमारास सेलसुरा जवळ कारचा भीषण अपघात झाला.चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि अनियंत्रित झालेली कार 40 फूट दरीमध्ये कोसळली.

या अपघातामध्ये सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला अशी प्राथमिक माहिती समजली आहे.अपघातातील सर्व मृत विद्यार्थ्यांचं वय 25 ते 35 च्या दरम्यान असल्याचं कळतंय.

मध्यरात्री एक वाजताच्या जवळपास अपघात झाला असल्याचे समजते.

दरम्यान, अपघातानंतर पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तातडीनं बचावकार्यास सुरुवात केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here