
सध्या कापसाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. याचा राज्यातील शेतकऱ्यांना फटका बसत आहे. कापसाच्या दरात वाढ कधी होणार याची शेतकऱ्यांना प्रतिक्षा आहे. कापसाच्या दरात वाढ होण्यासाठी निर्यातीत सातत्य ठेवणं गरजेचं असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळं केंद्र सरकारनं निर्यातीला प्रोत्साहन देणं गरजेचं असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.