काँग्रेस अखिलेश यादव यांच्याविरोधात निवडणूक लढवणार नाही, करहल मतदारसंघातून काँग्रेसची माघार

564

Uttar Pradesh Election 2022 News : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. निवडणुकांच्या निमित्ताने उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसने समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांच्याविरोधात निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मैनपुरी जिल्ह्यातील करहल या मतदारसंघातून अखिलेश यादव निवडणूक लढवत आहेत.

करहल मतदारसंघासाठी काँग्रेसने पहिलेच तिकीट जाहीर केले होते. करहल मतदारसंघातून ज्ञानवती यादव यांना तिकीट दिले होते. मात्र, आज ज्ञानवती यादव यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. काँग्रेसने या मतदारसंघातून माघार घेतल्याने याचा फायदा अखिलेश यादव यांना होणार आहे. करहल मतदारसंघासाठी तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे.

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेश विधानसभेसाठी एकूण 7 टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. पहिला टप्प्यातील मतदान प्रक्रिया 10 फेब्रुवारीला होणार आहे. दूसरा टप्पा 14 फेब्रुवारीला,  तिसरा टप्पा 20 फेब्रुवारीला, चौथा  23 फेब्रुवारीला पाचवा टप्पा 27 फेब्रुवारीला, सहावा टप्पा  3 मार्चला,  सातवा टप्पा  7 मार्चला पार पडणार आहे. दरम्यान या पाचही राज्यांची मतमोजणी  10 मार्चला होणार आहे.  उत्तर प्रदेशमध्ये एकूण 403 जागांवर मतदान होत आहे. सी वोटरच्या सर्वेनुसार उत्तर प्रदेशमध्ये भाजपला 223 ते 235 जागा मिळण्याचा अंदाज सांगण्यात आला आहे. तर समाजवादी पार्टीला 145 ते 157 जागा, बीएसपी ला 8 ते 16 जागा आणि काँग्रेसला 3 ते 7 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचबरोबर इंडिया टीव्हीच्या सर्वेनुसार भाजपला उत्तर प्रदेशमध्ये 230 ते 235, समाजवादी पार्टीला 160 ते 165, बीएसपी ला 2 से 5 जागा आणि काँग्रेसला 3 ते 7 जागा मिळतील असा अंदाज सांगण्यात आला आहे. या निवडणुकांच्या निमित्तीने समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव तसेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यामध्ये सध्या जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here