कसोटीमध्ये पुढचा कॅप्टन कोण? दिलीप वेंगसरकरांनी निवड समितीला झापलं

408

मुंबई: विराट कोहलीने (Virat kohli) कसोटी संघाच्या कर्णधारपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याच्याजागी नवीन कर्णधार कोण होणार? यावर सध्या चर्चा सुरु आहे. रोहित शर्मा, (Rohit sharma) केएल राहुल (KL Rahul) आणि ऋषभ पंत अशी वेगवेगळी नाव समोर आली आहेत. पण काही निश्चित नाहीय. रोहित सध्या वनडे आणि टी-20 चा कर्णधार आहे. पण तिन्ही फॉर्मेटमध्ये कर्णधारपद भूषवण इतकं सोप नाहीय. त्यात त्याच वय 34 आहे. त्यामुळे कसोटी संघाच्या कर्णधारपदासाठी त्याचाच विचार होईल, हे खात्रीने सांगता येणार नाही.

केएल राहुलने आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचे कर्णधारपद भूषवले होते. उद्यापासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु होणाऱ्या वनडे सीरीजचा तो कॅप्टन आहे. जोहान्सबर्गमध्ये त्याला नेतृत्वाची संधी मिळाली, तेव्हा त्याने काही चुका सुद्धा केल्या होत्या. त्यानंतर भविष्याचा विचार केल्यास, ऋषभ पंतचं एक नाव आहे. आयपीएलमध्ये त्याने दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व केलं. वय देखील त्याच्यासाठी एक जमेची बाजू आहे. पण कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याचा अभाव ही बाब त्याच्याविरोधात जाते.

दिलीप वेंगसरकरांच परखड भाष्यवरचे घटक लक्षात घेतले, तर कसोटीमध्ये कोहलीची जागा घेईल असं कुठलं एक नाव निश्चितपणे सांगता येणार नाही. याच मुद्यावर माजी क्रिकेटपटू आणि निवड समितीचे माजी अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनी परखड भाष्य केलं. “सध्याची आणि त्याआधीची निवड समिती कोहलीची जागा घेऊ शकेल, अशा नेतृत्वाला आकार देण्यात अपयशी ठरली” असे वेंगसरकर म्हणाले. ते टाइम्स ऑफ इंडियाशी बोलत होते.

दूरदृष्टीचा अभाव“भविष्यात कर्णधार घडवण्यासाठी आवश्यक असलेला दूरदृष्टीचा अभाव निवड समितीकडे दिसला. आम्ही धोनीला तयार केलं. पण ते कर्णधारपदी कोहलीची जागा घेऊ शकेल, असा खेळाडू ओळखू शकले नाहीत. मागच्यावर्षी भारताचा संघ श्रीलंका दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी शिखर धवनला कर्णधार का बनवलं? ते मला अजून समजलेलं नाही” असं वेंगसरकर म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here