कलम ३०७ या गंभीर गुन्हयातील फरार आरोपीस कोतवाली पोलीसांनी गुन्हा दाखल होताच १ तासाच्या आत केले जेरबंद

    242

    अहमदनगर -कोतवाली पोलीस स्टेशन येथील गुन्हा रजि नं.२०१/२०२३ भादंवि कलम ३०७ या गंभीर गुन्हयातील फरार आरोपीस कोतवाली पोलीसांनी गुन्हा दाखल होताच १ तासाच्या आत केले जेरबंद

    घटनेतील हकीकत आशिकी ०३/०२/२०२३ रोजी फिर्यादी नामे राहुल सुनिल शिंगरे (वय-२८ वर्षे धंदा-मोबाईल दुकान,रा रेणुका देवी मंदिराचे पाठीमागे केडगांव अहमदनगर) यांनी कोतवाली पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती की,दिनांक ०१/०३/२०२३ रोजी रात्री ०८.३८ वाजण्याचे सुमारास शिवसंग्राम वाईन्स दुकानाचे समोर माळीवाडा अहमदनगर या ठिकाणी फिर्यादीचा भाऊ नामे-अतिष शिंगरे यास त्याचा मित्र नामे राकेश भिंगारदिवे याने काही तरी कारणास्तव त्याचे डोक्याचे नाजुक भागास मारहाण करुन त्याचा जीव जाईल याची जाणीव असतांना सुध्दा जाणुनबुजुन वारंवार हाताच्या ठोशाने मारहाण करुन खाली पाडुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.या फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस स्टेशन गुरनं।२०१/२०२३ भादवि कलम ३०७ प्रमाणे गुन्हा रजि दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्ह्याचा तपास करत असतांना कोतवाली पोलीसांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,सदर गुन्हयातील फरार आरोपी नामे राकेश भिंगारदिवे हा स्वताचे अस्तित्व लपवुन बाहेरगावी एसटी बसने पळुन जाणार आहे अशी माहिती प्राप्त झाल्याने गुन्हे शोध पथकाने माळीवाडा व पुणे बसस्थानक परिसरात सापळा लावुन पथकातील अंमलदार यांनी त्यास शिताफीने पकडुन त्यास ताब्यात घेवून त्याचेकडे त्याचे नाव गाव विचारेल असता त्याने त्याचे नाव- राकेश रमेश भिंगारदिवे वय-३० वर्षे रा.दातरंगेमळा,नेप्तीनाका,अहमदनगर असे सांगुन सदर गुन्हयाबाबत चौकशी करता त्याने प्रथम उडवाउडविची उत्तरे दिली त्यास अधिक विश्वासात घेवून चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले आहे.सदर गुन्ह्याचा पुढील अधिक तपास हा सपोनि/विवेक पवार हे करीत आहेत.सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अनिल कातकाडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक/चंदशेखर यादव, सपोनि/विवेक पवार,गुन्हे शोध पथकाचे पोसई/मनोज कचरे,पोहेकाँ/गणेश धोत्रे,पोना/योगेश भिंगारदिवे, पोकॉ/संदीप थोरात,पोकाँ/अमोल गाढे,पोकॉ/कैलास शिरसाठ,पोकॉ/सोमनाथ राउत,पोकॉ/सुजय हिवाळे, पोकॉ/सागर मिसाळ आदिंच्या पथकाने केली आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here