बंगळूर* – कर्नाटकच्या सत्तारूढ भाजपमधील धुसफूस वाढीस लागल्याचे चित्र आहे. त्या पक्षाचे वजनदार नेते आणि ज्येष्ठ आमदार बासनगौडा पाटील यत्नाल यांनी एक सनसनाटी दावा केला आहे. त्यातून त्यांनी बी.एस.येडियुरप्पा यांचे मुख्यमंत्रिपद धोक्यात असल्याचे संकेत दिले आहेत. तर, येडियुरप्पा समर्थकांनी यत्नाल यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. त्यातून भाजपमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे सूचित होत असल्याने कर्नाटकात लवकरच राजकीय भूकंप होण्याची शक्यता बळावली आहे. कर्नाटकात नेतृत्वबदलाच्या चर्चा वारंवार पुढे येत आहेत. त्यासाठी प्रामुख्याने 77 वर्षीय येडियुरप्पा यांचे वाढते वय कारणीभूत ठरत आहे. त्याशिवाय, भाजपमध्ये उत्तर कर्नाटक विरूद्ध राज्याचा उर्वरित भाग अशी गटबाजी सुरू असल्याचेही सातत्याने दिसून येत आहे. अशातच यत्नाल यांनी येडियुरप्पा यांच्याविरोधात बंडाचे संकेत दिले आहेत. उत्तर कर्नाटकमधील जनतेच्या पाठिंब्यामुळे भाजपला मुख्यमंत्रिपद मिळाले. त्या विभागातून मोठ्या संख्येने भाजपचे आमदार निवडून आले. त्याची जाणीव पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वालाही आहे. येडियुरप्पा यांचा वारसदार उत्तर कर्नाटकातील असावा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही मनात आहे. त्यामुळे येडियुरप्पा फार काळ मुख्यमंत्रिपदावर राहणार नाहीत, असे यत्नाल पत्रकारांशी बोलताना म्हणाले. यत्नाल यांच्या दाव्यावर प्रदेश भाजपमधूनच तीव्र प्रतिक्रिया उमटली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील यांनी यत्नाल यांचा दावा फेटाळून लावला. पुढील तीन वर्षे मुख्यमंत्रिपदावर येडियुरप्पाच राहतील, असे त्यांनी म्हटले. तर येडियुरप्पा यांच्या एका समर्थक आमदाराने यत्नाल स्वप्न पाहत असल्याची खिल्ली उडवली. त्यामुळे सत्तारूढ गोटातील तीव्र मतभेदही चव्हाट्यावर आले.
ताजी बातमी
बिहारमध्ये पुन्हा ‘नितीश सरकार’ नितीश कुमारांनी १० व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर बिहार एनडीएने नवीन सरकार स्थापन केले. जदयूचे नेते नितीश कुमार यांनी १०...
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध, २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती
अहिल्यानगर - अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी विधानसभेच्या मतदार यादीच्या आधारे तयार केलेल्या मतदार याद्या महाराष्ट्र...
राज्य शासनाच्या युवा धोरण समितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड
अहिल्यानगर : राज्य शासनाच्या युवा धोरणसमितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड झाली असून शालेय शिक्षण व क्रीडा...
चर्चेत असलेला विषय
चक्रीवादळ बिपरजॉय: मुंबईत मुसळधार पाऊस, गुजरातच्या कच्छमध्ये वादळाचा प्रभाव; पंतप्रधान मोदींनी आढावा बैठक घेतली
गोपी मणियार घनघर, देव कोटक: चक्रीवादळ बिपरजॉय, जे रविवारी अत्यंत तीव्र चक्री वादळात रूपांतरित झाले, सध्या मुंबईच्या...
महाराष्ट्राला हादरवणारा ट्रक घोटाळा, 2 जण अटकेत, कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त.
धुळे : बनावट कागदपत्रांच्या साहाय्याने महागड्या ट्रकची विक्री करणाऱ्या टोळीचा धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पर्दाफाश केला आहे. या टोळीने धक्कादायक खुलासे...
अहमदनगर ब्रेकिंग : तनपुरे कारखाना आंदोलक कामगारांना अटक
अहमदनगर, 7 सप्टेंबर 2021
:- राहुरी येथील तनपुरे साखर कारखाना कामगार आंदोलकांनी प्रवरा कारखान्याच्या कामगार काळे फासल्याप्रकरणी राहुरी...
ममता बॅनर्जींनी मोठ्या पंक्तीला प्रत्युत्तर दिले: “संदेशखळीमध्ये आरएसएसचा तळ आहे”
पश्चिम बंगालमधील संदेशखळी येथे भाजपच्या लैंगिक छळाच्या आरोपांवरून राजकीय वादळ उठले असताना, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले...



