कर्नाटकातील घटनेचे उदगीरमध्ये पडसाद, हिजाबच्या समर्थनार्थ हजारो महिला उतरल्या रस्त्यावर

399

Hijab Controversy: कर्नाटकमध्ये हिजाब प्रकरण चांगलंच तापलंय. यातच कर्नाटक उच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांना शाळा आणि महाविद्यालयांमध्ये धार्मिक पोशाख घालण्यास मनाई केलीय. या घटनेचे देशभरात पडसाद उमटत आहेत. यावर विविध स्तरावरून प्रतिक्रिया येत आहेत. या घटनेचे लातूर जिल्ह्यातही पडसाद उमटले आहेत. लातूरच्या उदगीर येथे हिजाबच्या समर्थनार्थ हजारो महिला रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं.

उदगीर शहरात हिजाबच्या समर्थनार्थ हजारो महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे धरणे आंदोलन पुकारले होतं. हिजाब आमचा अधिकार आहे, आमचा अधिकार कोणीही काढू शकत नाही, असा पवित्रा महिलांनी घेतला होता. आंदोलनातील महिलांची वाढती संख्या पाहून पोलीस प्रशासनाने मुख्य रस्ता वाहतुकीसाठी बंद केला होता. यामुळं शहरातून होणारी वाहतूक इतर मार्गानं वळविण्यात आली होती. शहरात शांतता सुरक्षित ठेवण्यासाठी आंदोलन स्थळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. यात आरसीपी पोलिसांची एक तुकडी तैनात करण्यात आली होती. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत हिजाब आमचा हक्क आहे अशा घोषणा आंदोलक महिलांनी त्यावेळी दिल्या. या आंदोलनाला जमीयते उलेमा ए हिन्द ,राष्ट्रवादी कांग्रेस ,एमआयएम तसेच दलित अधिकार मंच यासह अनेक संघटना आणि पक्षाचा या आंदोलन पाठीबा होता. 

नेमकं प्रकरण काय?हिजाब परिधान केल्यामुळं त्यांना वर्गात जाऊ दिले जात नसल्याचा आरोप उडुपी येथील सरकारी गर्ल्स पीयू कॉलेजच्या काही विद्यार्थिनींनी केल्यानंतर कर्नाटकात गेल्या महिन्यात निदर्शने सुरू झाली. तेव्हापासून राज्यात अनेक ठिकाणी अशांततेच्या घटना घडल्या आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला, पुरुषांचा एका गट बुरख्यातील महिला विद्यार्थिनीकडे जात घोषणाबाजी करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. यावर टीका देखील झाली. कमल हसन, रिचा चढ्ढा, स्वरा भास्कर, हेमा मालिनी आणि जावेद अख्तर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी याबाबत मत व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here