सिरम इन्स्टिट्यूटच्या पुण्यातील प्लांटला मोठी आग
पुणे : करोना लस निर्मिती करणार्या पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये आग लागली आहे. मांजरा येथिल BCG लस बनवण्याच्या नव्या इमारतीला आग लागलेली आहे, अशी प्राथमिक माहिती आहे.. सीरम इन्स्टिट्यूटचा हा मांजरी भागातील नवीन प्लांट आहे. अग्निशामक दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.दुपारी दोन वाजताची घटना असून परिसरात धुराचे लोट पसरले आहेत.या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.कोरोनाची लस तयार करण्यात सीरम संस्थेचा मोठा वाटा आता. कोव्हिशील्ड लस ही सीरममध्ये तयार करण्यात आली आहे. देशातील अनेक भागांमध्ये सध्या कोव्हिशील्ड लसीच्या पहिल्या टप्प्यातील लसीकरण सुरू आहे.