‘करोना गो, गो करोना गो’,रामदास आठवले यांच्या कविता आता ‘लाव रे तो व्हिडिओ’ कार्यक्रमात

आपल्या सगळ्यांचा लाडका सूत्रसंचालक निलेश साबळे आता ‘झी युवा’ वाहिनीवर सुद्धा दिसत आहे. ‘लाव रे तो व्हिडीओ’ हा एक आगळावेगळा, जबरदस्त कार्यक्रम तो घेऊन आला आहे. प्रेक्षकच प्रेक्षकांचे मनोरंजन करत असलेला हा कार्यक्रम सर्वांनाच खूप आवडत आहे. आता या कार्यक्रमात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे लॉकडाउनमध्ये तयार केलेल्या कविता सादर करणार आहेत.

‘लाव रे तो व्हिडीओ’ हा एक आगळावेगळा, जबरदस्त कार्यक्रम प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमामुळे अनेकांना घरातूनच आपले कौशल्य सादर करण्यासाठी उत्तम व्यासपीठ मिळाले, त्यामुळे प्रेक्षकांसोबतच कलाकारांचा देखील हा कार्यक्रम आवडता झाला आहे. या आठवड्यात प्रेक्षकांना सुप्रसिद्ध व्यक्तींचे व्हिडीओ पाहायला मिळणार आहेत.

‘करोना गो, गो करोना गो’ हे कोण म्हणालं होतं असं कुणालाही सांगण्याची गरज नाही. हा व्हिडीओ संबंध महाराष्ट्रात तुफान पसरला आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले गो करोना गो म्हणताच देशभरात प्रसिद्ध झाले. आठवलेंना छोट्या आणि खुमासदार कविता करण्याचा छंदच आहे. आता रामदास आठवले यांनी लॉकडाउनमध्ये केलेल्या कविता प्रेक्षकांना ऐकण्याची संधी मिळणार आहे. या कविता रामदास आठवले ‘लाव रे तो व्हिडिओ’ या कार्यक्रमात सादर करणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here