मुकुंदनगर येथील श्री. शेख रफिक उस्मान (पेटीवाले) यांचे चिरंजीव अमान शेख याने मे 2025 मध्ये घेण्यात आलेल्या अत्यंत कठीण आणि प्रतिष्ठेच्या चार्टर्ड अकाउंटंट (C.A.) अंतिम परीक्षेत विशेष गुणवत्तेसह यश मिळवून आपल्या कुटुंबाचेच नव्हे तर संपूर्ण समाजाचे नाव उज्ज्वल केले आहे. सर्वसामान्य घरातून आलेल्या अमान याचा हा प्रवास म्हणजे जिद्द, चिकाटी, कष्ट आणि आत्मविश्वास यांचा जिवंत झगमगता दीप आहे. मर्यादित आर्थिक साधनसामग्री असूनही त्यांनी कधीही हार मानली नाही. आई-वडिलांचा त्याग, प्रचंड अभ्यास आणि प्रबळ इच्छाशक्ती यांच्या जोरावर अमान शेख यांनी अशक्य वाटणाऱ्या परीक्षेत विजय मिळवला.
त्याच्या या यशामागे फक्त त्याची वैयक्तिक मेहनतच नाही, तर योग्य दिशा देणारे C.A. अभय भंडारी सरांचे मार्गदर्शन हेही महत्त्वाचे ठरले.
या ऐतिहासिक यशाच्या सन्मानार्थ कर्मयोगी प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेने अमान शेख व त्यांच्या कुटुंबीयांचा अत्यंत सन्मानपूर्वक सत्कार केला. प्रतिष्ठानकडून केवळ गौरव नव्हे, तर समाजातील खऱ्या हिऱ्यांना ओळखून त्यांना व्यासपीठ देण्याचा हा एक स्तुत्य उपक्रम ठरला.