Petrol Diesel Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मागील काही दिवसांपासून चढ-उतार सुरू आहे. कच्चा तेलाची मागणी वाढल्यामुळे किंमतीतही वाढ झाली आहे. शुक्रवारी ब्रेंट क्रूड ऑइलच्या दरात किंचित घसरण झाली असल्याचे दिसून आले आहे. भारतात इंधन कंपन्यांनी दर स्थिर ठेवले आहे. मागील दोन महिन्यांपासून इंधन कंपन्यांनी आपले दर स्थिर ठेवले आहेत. महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये पेट्रोलचे दर 100 रुपयांहून अधिक आहे.
भारतीय तेल कंपन्यांनी 04 डिसेंबरपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. इंधन दर कायम असल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला काहीसा दिलासा मिळणार आहे. गेल्या दोन महिन्यांत तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel Price) किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत 109.98 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 94.14 रुपये प्रति लिटर इतकी आहे. दिल्लीत पेट्रोलची किंमत 95.41 रुपये प्रति लिटर, तर डिझेलची किंमत 86.67 रुपये प्रति लिटर इतकी आहे. चेन्नईत पेट्रोल 101.40 रुपये प्रति लिटरनं आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. तर कोलकातामध्ये डिझेलची किंमत 89.79 रुपये आणि पेट्रोलचा दर 104.67 रुपये प्रति लिटर इतका आहे.




