कंगना राणावत हीचा केंद्रसरकारने पद्मश्री काढून घ्यावा आणि गुन्हा दाखल करुन अटक करावी – नवाब मलिक

670

मुंबई दि. १२ नोव्हेंबर – कोट्यवधी भारतीयांचा आणि स्वातंत्र्यसेनानी यांचा अपमान करणार्‍या अभिनेत्री कंगना राणावत हीचा केंद्रसरकारने पद्मश्री काढून घ्यावा आणि गुन्हा दाखल करुन अटक करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले ती भीक होती खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले असे वादग्रस्त वक्तव्य अभिनेत्री कंगना राणावत हिने केले होते यावर नवाब मलिक यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. १८५७ पासून स्वातंत्र्य लढ्याला सुरुवात झाली. लाखो स्वातंत्र्य सेनानींनी आपल्या प्राणाची आहुती दिली. महात्मा गांधी यांनी या देशात एक मोठा लढा निर्माण केल्याने ब्रिटिशांनी स्वतंत्र भारत करण्याची घोषणा केली आणि १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. एवढं बलिदान असताना कंगना राणावत ही अभिनेत्री ओवरडोस झाल्यासारखी काहीही बोलते अशी जोरदार टीकाही नवाब मलिक यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here