औरंगाबाद शहरात अल्ट्रासोनिक वॉटर मीटर बसवण्याचा निर्णय

437

औरंगाबाद शहरात लवकरच स्मार्ट सिटी तर्फे अत्याधुनिक तंत्रज्ञान असणारे अल्ट्रासोनिक पाण्याचे मीटर बसवण्यात येणार आहे. यामुळे जेवढे पाणी वापरात येईल, तेवढेच पैसे वापरकर्त्याला द्यावे लागतील. शहरात व्यावसायिक पाणी वापरकर्त्यांसाठी वॉटर मीटर बसवण्याचा निर्णय मनपा आयुक्त तथा प्रशासक आणि औरंगाबाद स्मार्ट सिटी सीईओ आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद स्मार्ट सिटी तर्फे घेण्यात आला होता. हे वॉटर मीटर अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून तयार करण्यात आलेले तसेच अल्ट्रासोनिक असावेत, असा निर्णय औरंगाबाद स्मार्ट सिटी तर्फे घेण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here