- कोरोना विषाणू चा नवीन प्रकार म्हणजे ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतांना दिसून येत आहे. राज्यात रविवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये औरंगाबादच्या रुग्णाचा समावेश असल्याने औरंगाबाद प्रशासन खडबडून जागे झाले असून शहरांमध्ये रहिवासी राहत असलेल्या भागातील रहिवाशांना सदर रुग्णाच्या नातेवाईकांना क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती मनपा प्रशासनातर्फे देण्यात आली. पॉझिटिव्ह आढळून आलेला हा रुग्ण इंग्लंडचा प्रवास करून औरंगाबादेत आला होता. मात्र त्यानंतर पुन्हा मुंबईत गेल्यावर त्याचा ओमायक्रोनचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळून आला आहे. पॉझिटिव्ह आल्यानंतर हा शहरातील ज्या भागात राहत होता त्या भागातील नागरिक तसेच त्याच्या नातेवाईकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. याआधी मराठवाड्यातील लातूरमध्ये ओमायक्रोनचा पहिला रुग्ण आढळून आला होता.औरंगाबादच्या ओमायक्रॉन बाधित आढळून आलेल्या रूग्णाला मुंबईतील सेव्हन हिल रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. या रुग्णाने कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले असून सध्या कुठल्याही प्रकारचा त्रास त्याला झालेला नाही.





