*औरंगाबाद जिल्ह्यामध्ये २७ सप्टेंबरपासून पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता*

*औरंगाबाद जिल्ह्यामध्ये २७ सप्टेंबरपासून पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता* _

शुक्रवार, शनिवार, रविवारी औरंगाबाद जिल्ह्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज._ औरंगाबाद जिल्ह्यातही पुढील पाच दिवस वातावरण ढगाळ राहणार आहे. तसेच शहरासह ग्रामीण भागात तुरळक ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

▪️ सोमवारी म्हणजेच २७ सप्टेंबर रोजी औरंगाबाद जिल्ह्यात पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल, अशी शक्यता आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. *कोणत्या जिल्ह्यात कधी व कसा राहणार पावसाचा अंदाज?*

▪️ *दि. २३ सप्टेंबरः* परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.▪️ *दि. 24 सप्टेंबर:* परभणी, हिंगोली, लातूर व नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

▪️ *दि. 25 सप्टेंबर:* परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. *दि. 26 सप्टेंबर:* जालना, परभणी, नांदेड, लातूर व हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. *दि. 27 सप्टेंबर:* औरंगाबाद, जालना व लातूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे,ही माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागाचे मुख्य प्रकल्प समन्वयक डॉ. के.के, डाखोरे यांनी दिली आहे.*नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा..*

▪️गेल्या आठवडाभरापासून सुरु असलेल्या पावसामुळे मराठवाड्यातील सर्वच धरणे तुडुंब भरली असून सर्वात मोठे असलेले जायकवाडी धरणही ७५ टक्के भरले आहे. परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड या जिल्ह्यांतील धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. हे पाणी नदीपात्रात सोडण्यात येत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुढील पाच दिवसही अपेक्षेप्रमाणे मुसळधार पाऊस कोसळला तर ग्रामीण भागातील नागरिकांना पूरस्थितीला सामोरे जावे लागू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here