औरंगाबाद जिल्ह्यामधील महत्वाच्या घडामोडी!

426

औरंगाबाद जिल्ह्यामधील महत्वाच्या घडामोडी! थोडक्यात…_

?सामायिक प्रवेश (सीईटी) परीक्षेसाठी औरंगाबाद विभागातून 1 लाख 10 हजार 168 विद्यार्थ्यांची नोंदणी.

?औरंगाबाद शहरातील आजारी, अंथरुणावर पडून असलेल्या नागरिकांना घरीच मिळणार कोरोना लस; नोंदणी करण्याचे महापालिकेचे आवाहन.

?औरंगाबाद शहर पोलिस आयुक्तालयतर्फे शहरात वाढलेल्या सोनसाखळी चोरीचे प्रकार थांबवण्यासाठी जनजागृती मोहीम.

? सिडको पोलिस ठाण्याचे पो.नि.गिरी यांच्या नेतृत्वाखाली सोनसाखळी जनजागृती मोहीमेत एकूण 42 पोलिसांचा चमू शहरातील विविध भागात सदरची मोहीम यशस्वीरित्या राबवित आहे..

? ऊस, रब्बी, खरीप पिकांच्या उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई देण्याची गंगापूर तहसीलदारांना वंचित बहुजन आघाडीतर्फे निवेदन.

?गंगापूर शहरात पोलिसांची कल्याण मुंबई मटका बुकिंगवर कारवाई.

? औरंगाबाद-सिल्लोड महामार्गावरील चिंचखेडा गावाजवळ काळी पिवळी जीप आणि टिप्परचा अपघात; 2 जण गंभीर जखमी.

? शेलगाव खुर्द येथील विद्यार्थ्यांना कान, नाक, घसा तज्ञ डॉ. गौरव कारले यांचे मार्गदर्शन.

? बिडकीन पोलीस ठाण्यातील 12 पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या.

? विद्यापीठ, महाविद्यालये सुरू करण्याच्या नियोजनासाठी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी सलग 3 दिवस बोलावली बैठक.

? आरक्षण देताना केंद्र सरकार जबाबदारी ढकलत आहे; मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा आरोप.

? ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भडकल गेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन.

? दिल्ली प्रदेशच्या वतीने शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे गदा देऊन स्वागत.

? ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून देशभरातील सर्व नेते एकत्र येत आहे, ओबीसी सर्व ताकतीने उभा राहील -मंत्री विजय वडेट्टीवार.

? औरंगाबादमधील ‘जल आंदोलन’ ची माहिती घेत राज ठाकरे यांनी मनसे सैनिकांची पुण्यात घेतली भेट.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here