*औरंगाबाद जिल्ह्यात शिवसेना शेतकऱ्यांसाठी पीक विमा मदत केंद्र सुरु करणार*

*औरंगाबाद जिल्ह्यात शिवसेना शेतकऱ्यांसाठी पीक विमा मदत केंद्र सुरु करणार*

औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. ▪️शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचून स्थिती पडताळून पाहण्यात विमा कंपनी कमी पडत असल्याने ऑनलाइन तक्रारीऐवजी शेतकऱ्यांकडून ऑफलाइन अर्ज घेऊन नुकसान भरपाईची नोंद घ्यावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. ▪️तसेच जिल्ह्यातील विविध गावात शिवसेना पिक विमा मदत केंद्र सुरु करणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख तसेच आमदार अंबादास दानवे यांनी दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. ▪️हे पंचनामे करण्यासाठी एचडीएफसी ॲग्रो जनरल इन्शुरन्स कंपनीने १५० समन्वयकांची नियुक्ती केली आहे. मात्र तक्रारींची संख्या जास्त असल्याने हे समन्वयक कमी पडत असल्याची तक्रार शिवसेनेने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here