औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी!
थोडक्यात.._1 सप्टेंबर 2021 ब्रेकफास्ट अपडेट महा 24 news*औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी! थोडक्यात..*_
➡️ डीपी रस्त्यांवर रेखांकनानुसारच विद्युत खांब लावा; मनपा प्रशासक अस्तिककुमार पांडेय.
➡️औरंगाबाद शहरात मनसेचा दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न; पोलिसांनी दहीहंडी जप्त करत मनसेच्या पदाधिकाऱ्यांना घेतले ताब्यात.
➡️ ग्रामीण भागात शांतता व कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलिस अधिनियम १९५१ च्या ३७(१) व (३) कलमान्वये जिल्ह्याच्या ग्रामीण हद्दीत दि. १५ सप्टेंबर २०२१ पर्यंत शस्त्रबंदी आणि जमावबंदी आदेश लागू केला.
➡️ कन्नड तालुक्यातील ५ मंडळात अतिवृष्टी; भिलदरी येथील पाझर तलाव फुटला, तर औट्रम घाटात दरड कोसळल्याने 8 म्हशीसह चालक ठार.
➡️ अहमदनगर जिल्ह्यात पुराच्या पाण्यात अडकलेल्या १५ नागरिकांना औरंगाबाद शहरातील अग्निशामक दलाच्या जवानांनी दिले जीवदान.
➡️ पैठणच्या नाथसागर जलाशयात 42 टक्के पाणीसाठा.
➡️ कोरोनामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा; पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांचे आवाहन.
➡️ सिल्लोड तालुक्यातील धोत्रा येथे गोवंश घेऊन जाणाऱ्या गाडीला अपघात; गाडी जागेवर सोडून आरोपी फरार, अजिंठा पोलीस ठाण्यात नोंद.
➡️ टोमॅटो मातीमोल भावाने विक्री होत असल्याने वैजापूर तालुक्यातील परसोडा येथे विष प्राशन करून शेतकऱ्याची आत्महत्या.
➡️ सोयगाव तालुक्यातील बनोटी हिवरा नदीला आला महापूर, अनेक दूकाने गेली वाहून; पुरात वाहून जाताना एकाला नागरिकांनी वाचविले.
➡️ कन्नड तालुक्यातील नागद येथील गडदगड नदीला महापूर; पिकांसह मालमत्तेचेs मोठ्या प्रमाणात नुकसान._____________________________________________________





