औरंगाबादेत फटाक्यांसाठीचे नियम
*शहरात फटाक्यांसाठी काय आहेत नियम?* नागरिकांनी विक्रेत्यांकडे सुधारित ग्रीन फटाक्यांचीच मागणी करावी मोठी लड किंवा 500 च्या पुढे फटाके असलेली लड घेऊ नये.ऑनलाइन फटाके मागवू नयेत. बेरियम सॉल्ट केमिकल असलेल्या फटाक्यांवर बंदी आहे. लिथियम अल्सेनिक असलेले फटाके घेऊ नयेत 125 डेसिबल आवाज करणारे फटाके वापरणे टाळावे.✅ नागरिकांना माहिती नसली तरीही प्रशासनाकडून याची तपासणी केली जाणार आहे. मोठ्या आवाजाचे फटाके वाजवणे टाळावे.✅ रात्री 8 ते 10 या कालावधीतच फटाके वाजवावेत.✅आपल्या आजू-बाजूच्या लहान मुले, वृद्धांची काळजी घेऊन, ध्वनी व हवेचे प्रदूषण होणार नाही, याची काळजी घ्यावी.शांतता झोनच्या 100 मीटर परिसरात फटाके वाजवू नयेत. शांतता झोन म्हणजे न्यायालय, हॉस्पिटल, नर्सिंग रुम इत्यादी.✅ नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांचे पथक कायदेशीर कारवाई करेल, असा इशारा पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी दिला आहे.