औरंगाबादमध्ये गोळीबार करून बांधकाम व्यावसायिकाचे फिल्म स्टाईल अपहरण

शहरातील संग्रामनगर उड्डाणपुलाजवळील देवानगरी परिसरातून एका बांधकाम व्यावसायिकाचे गोळीबार करून अपहरण केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी 11.20 वाजेच्या दरम्यान घडली ◾ काही अंतर गेल्यानंतर कार बंद पडल्याने अपहरणकर्ते बांधकाम व्यावसायिकांला मध्येच सोडून पळाल्याने पुढील अनर्थ टळला.

बांधकाम व्यावसायिक नाजीम पठाण राउफ पठाण यांचे संग्रामनगर येथील एका साईट वर काम चालू असताना, सकाळी 11.15 वाजेच्या सुमारास एका पांढऱ्या कार मधून 3 ते 4 जण तेथे आले. त्यांनी नाजीम पठाण यांना गाडीत बसण्यास सांगितले

नाजीम पठाण यांनी विरोध केला असता एकाने जवळील रिव्हाल्व्हरमधून हवेत गोळीबार केला. यानंतर नाजीम पठाण यांना गाडीत टाकून ते निघाले

पुढे काही अंतर गेल्यानंतर देवळाई ते भालगांव दरम्यान त्यांची कार बंद पडली. यामुळे अपहरणकर्ते नाजीम पठाण यांना तेथेच सोडून पसार झाले555tt6

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here