औरंगाबादचे संभाजीनगर करण्यास कॉंग्रेसचा स्पष्ट विरोध
नाव बदलून इतिहास बदलणार नाही
– बाळासाहेब थोरात
नामकरणाचं राजकारण सोडून हिंमत असेल तर सत्ताधाऱ्यांनी संभाजीनगर नामकरणाचा अध्यादेश काढावा असं खुलं आव्हान मनसेतर्फे देण्यात आलं आहे. आता, शिवसेनेने यासंदर्भात हालचाली सुरु केल्याचं दिसून येत आहे. औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांनी औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करावं यासाठी मंत्रालयात प्रस्ताव पाठवला आहे.
या संदर्भात काँग्रेसची असलेली भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केली आहे. काँग्रेसला नामकरण मान्य नसल्याचं ते म्हणाले आहेत. ‘या प्रस्तावाबद्दल मला माहिती नाही. महाविकास आघाडी ही विकासाच्या मुद्द्यावर करण्यात आली आहे. सामान्य माणसाला केंद्रीभूत करून सरावानं सोबत घ्यायचं, त्यांना सुखी करायचं हा आमचा किमान सामान कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.’ असं ते म्हणाले.
‘विकासावर आम्ही केंद्रित आहोत. नावं बदलणं हा विषय नाही. त्यामुळे काँग्रेस किंवा महाविकास आघाडीचा अजेंडा म्हणून नामकरण आम्हाला मान्य नाही. काँग्रेस विकासाची वाटचाल करणारी आहे.
‘नाव बदलल्याने इतिहास बदलू शकत नाही.’ अशी भूमिका बाळासाहेब थोरात यांनी घेतली.