औंध – बोपोडी परिसरातील नागरिकांना विद्यापीठात व्यायामासाठी परवानगी द्यावी :

629

विद्यापीठ परिसर जवळ असल्याने औंध, औंधरोड, बोपोडी,खडकी स्टेशन परिसरातील सर्वसामान्य नागरीक फिरण्यासाठी तसेच व्यायाम करण्यासाठी विद्यापीठ परिसरामध्ये येत असतात. कोरोना काळात विद्यापीठ प्रशासनाने नागरिकांना विद्यापीठ आवारामध्ये फिरण्यासाठी तसेच व्यायामासाठी बंदी घातली होती. मात्र सध्या सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाल्याने विद्यापीठ परिसर ही नागरिकांना व्यायामासाठी आणि फिरण्यासाठी घातलेली बंदी मागे घ्यावी यासाठी आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. नितीन करमळकर तसेच कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार यांना निवेदन दिले. निवेदनाद्वारे त्यांना याबाबत लक्ष घालून सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती केली. कुलगुरूंनी याबाबत लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

यावेळी माझ्यासोबत योगेश केरकर, सुनील दैठणकर, हिमांशु मुथय्या, ऋषभ काळे, अनिल माने, प्रतिक वाघमारे आदि उपस्थित होते.

सुनील माने,
पुणे शहर चिटणीस,
भाजप.
१७ सप्टेंबर २०२१

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here