ओमीक्रॉन चा विळखा रोखण्यासाठी ठोस उपाययोजना : आज पासून काही निर्बंध लागू:

    अहमदनगर जिल्हयात दररोज अंदाजे 40 ते 70 च्या दरम्यान कोरोनाबाधित रुग्ण वाढत असल्याने तसेच ओमीक्रॉन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव हा कोविड-19 विषाणूच्या पूर्वीच्या व्हेरिएंटपेक्षा अतिशय वेगाने पसरत असल्याचे आढळून आलेले आहे.

    अहमदनगर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या 24/12/2021 रोजीच्या बैठकीमध्ये नागरिकांना अधिक प्रमाणात लसीकरणासाठी (दोन्ही डोस) प्रवृत्त करणेसाठी काही ठोस उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांचे लसीकरण होणे आवश्यक असून जिल्हाधिकाऱ्यांनी 25/12/2021 पासून काही निर्बंध लागू केले आहेत.

    *निर्बंध खालीलप्रमाणे..*

    अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालये, खाजगी आस्थापना/कार्यालये, व्यावसायिक व औदयोगिक आस्थापना, हॉटेल, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल, नाट्यगृहे, सिनेमागृह, लॉन्स, मंगल कार्यालये, कृषी उत्पन्न बाजार समिती व इतर समारंभ, मेळावे व त्या प्रकारचे सर्वच सार्वजनिक ठिकाणी व कार्यक्रमात “No Vaccine No Entry” (लस नाही, प्रवेश नाही) याप्रमाणे निर्बंध लागू करीत आहे.

    वरील प्रमाणे प्रत्येक आस्थापनाच्या ठिकाणी येणाऱ्या लोकांना *कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची किमान एक मात्रा घेतल्याची खात्री करणे बंधनकारक* असणार आहे आणि याशिवाय प्रवेश देणे प्रतिबंधित राहील.

    कोरोनाविषयक मार्गदर्शक सूचना, निर्देश आणि कोविड अनुरूप वर्तन (Covid Appropriate Behaviour) चे तसेच राज्य व केंद्र शासनाच्या निर्णयातील अटी व शर्तीचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक राहील.▪️ वर दिलेल्या ठिकाणी प्रवेश करतेवेळी प्रत्येक व्यक्तीने योग्य पध्दतीने मास्क (नाकावर असणं गरजेचं) घालणे आवश्यक असून नाक व तोंड नेहमी मास्कने झाकलेले हवे.

    सर्व नागरिकांनी वरीलप्रमाणे निर्देश, सूचना, शासन निर्णयातील अटी व शर्तीचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक राहील. यासंदर्भात कोणतेही उल्लंघन दिसून आल्यास शासन आदेश दि.27/11/2021 मध्ये नमूद केल्याप्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here