वयाच्या 52 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने थायलंड येथे निधन झाले आहे. दिग्गज फिरकी गोलंदाजाला क्रीडाविश्व मुकलं आहे. क्रिकेटर शेन वॉर्न यांनी काही दिवसांपूर्वीच रशिया आणि युक्रेन युद्धावर आपली प्रतिक्रिया दिली होती. शेन वॉर्न यांनी युक्रेनच्या बाजूने एक संदेश दिला होता आणि रशियाच्या कारवाईला पूर्णपणे चुकीचे म्हटले होते.ऑस्ट्रेलियासाठी हा दुसरा धक्का आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू रॉड मार्श यांचे निधन झाले त्यानंतर आता शेन वॉर्न यांच्या निधनाची बातमी समोर आली आहे.
ऑस्ट्रेलियन न्यूज चॅनल फॉक्स स्पोर्टच्या वृत्तानुसार, शेन वॉर्न थायलंडमध्ये होता आणि तेथे त्याचा अचानक संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाला. शेन वॉर्नच्या व्यवस्थापन संस्थेच्या हवाल्याने फॉक्स स्पोर्टने एका निवेदनात म्हटले आहे की, वॉर्न थायलंडमधील एका व्हिलामध्ये होता जेथे तो शनिवारी सकाळी (ऑस्ट्रेलियन वेळेनुसार) बेशुद्धावस्थेत आढळला होता, परंतु वैद्यकीय पथकाच्या सर्वतोपरी प्रयत्नांनंतरही तो शुद्धीवर येऊ शकला नाही.निवेदनानुसार, शेन वॉर्न थायलंडमधील कोह सामुई बेटावर होता आणि तिथे त्याच्या व्हिलामध्ये राहत होता. शेन वॉर्नच्या कुटुंबीयांनी गोपनीयतेचा आदर करण्याचे आवाहन केले असून उर्वरित माहिती योग्य वेळी उपलब्ध करून दिली जाईल, असे म्हटले आहे.