ऑनलाईन ‘त्या’ भामट्याने गंडविले
‘आमची फायनान्स कंपनी २ लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन देते, कर्जं हवं असले तर तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवून आम्ही सांगू ती ‘प्रोसेस’ पूर्ण करा, तुमचे पर्सनल लोन शंभर टक्के मंजूर होईल’, अशी ‘पोपटपंची’ करणाऱ्या नवीदिल्लीच्या एका भामट्याने श्रीरामपूरच्या एका व्यक्तीला तब्बल १ लाख ७० हजार रुपयांना गंडा घातला. यासंदर्भात फसवणूक झालेल्या शुभम अशोक कवडे.यांनी सदर फसवणुकीसंदर्भात सायबर सेल कार्यालयात तक्रार अर्ज दिला.
राजधानी नवीदिल्लीच्या गुडगाव या भागातल्या मुक्ती फायनान्स कंपनीची पाहिल्यानुसार कवडे यांनी सदर कंपनीकडे संपर्क साधला. या कंपनीचे सिनियर मॅनेजर राकेश प्रसाद शर्मा या व्यक्तीने कवडे यांना शर्मा याने सांगिलेल्या ‘प्रोसेस’नुसार संबंधित फायनान्स कंपनीच्या बँक खात्यामध्ये कवडे कधी दिड हजार, कधी अडीच हजार, कधी नऊ हजार, कधी दहा हजार असे पैसे वेळोवेळी भरत गेले.
कवडे यांनी सरळ मनाने शर्मा यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत सर्व त्याच्या सर्व ‘प्रोसेस’ पूर्ण केली.
गुडगावमध्ये असे ‘भामटे’ भेटतात फुटाफूटांवर!
राज्यातल्या एखाद्या नामांकित वर्तमानपत्रात पेड ‘जोडीदार’ मिळेल, कर्ज मिळेल, लॉटरी जिंका अशी छोटी जाहिरात देऊन विविध प्रलोभने दाखवायची आणि ‘शिकार’ जाळ्यात आल्यावर संबंधितास कंपनीच्या बँक खात्यात पैसे भरण्याची ‘प्रोसेस’ पूर्ण करायला लावायची आणि एकदा इच्छित पैसे आले,
की तात्पुरते बँक खाते, तात्पुरते नाव वापरून जाहिरातीमध्ये दिलेला मोबाईल नंबरचे सिमकार्ड बंद करायचे, असे प्रकार राजधानी नवीदिल्लीतल्या गुडगावमध्ये सर्रास चालतात. त्यामुळे या भागात असे ‘भामटे’ फुटाफुटांवर भेटतात.





