ऑक्सिजनचा पुरवठा शंभर टक्के पुरेल,’ अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली

    953

    महाराष्ट्रात जे काही ऑक्सिजन उत्पादित करणारे प्लांट आहेत, त्या सर्वांच्या बाबतीत आम्ही महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी उत्पादन होणाऱ्या ऑक्सिजनपैकी ८० टक्के ऑक्सिजनचा पुरवठा हा अन्य उद्योगांना होत होता, तर करोना साथ येण्याआधी केवळ २० टक्केच ऑक्सिजनचा पुरवठा मेडिकलसाठी केला जात होता.

    आता मात्र त्यात बदल करण्यात आला आहे. एकूण ऑक्सिजन उत्पादनाच्या ८० टक्के पुरवठा आता मेडिकलसाठी व २० टक्के पुरवठा उद्योगांसाठी करावा, असे निश्चित करण्यात आले आहे. हे कायद्याने बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात करोना बाधित व अन्य रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही. ऑक्सिजनचा पुरवठा शंभर टक्के पुरेल अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here