
तंत्रज्ञानाच्या जगात रोज नवनवीन चमत्कार घडत आहेत, आणि आता तर चक्क रेस्टॉरंटमध्येही AI शेफची एंन्ट्री झाली आहे. रेस्टॉरंटमध्ये AI शेफ असेल ही कल्पनाच अनेकांना आश्चर्यचकित करणारी आहे. दुबईतील प्रसिद्ध बुर्ज खलिफाजवळ लवकरच जगातील पहिले AI रेस्टॉरंट सुरू होणार आहे. WOOHOO नावाच्या या रेस्टॉरंटचे वैशिष्ट्य म्हणजे, इथला मेन्यू पदार्थांची चव आणि ग्राहकांना दिली जाणारी सर्व्हिस हे सर्व एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मॉडेल ठरवणार आहे.दुबईमध्ये सप्टेंबर महिन्यात सुरू होणारे हे रेस्टॉरंट खवय्यांसाठी एक वेगळ अनुभव देणारे ठरणार आहे.
AI शेफ म्हंटल्यावर तुमच्या मनात पहिला प्रश्न आला असेल की, आता रेस्टॉरंटमध्ये जेवणही AI किंवा रोबोट बनवणार का? तर तसे नाही. सध्या तरी जेवण बनवण्याचे काम मानवी शेफच करतील. पण रेस्टॉरंटचा मेन्यू काय असेल, रेस्टॉरंटमधील वातावरण कसे असेल आणि ग्राहकांना सेवा कशी दिली जाईल, हे सर्व शेफ ऐमान नावाचे एक विशेष AI मॉडेल मानवी शेफच करतील. पण रेस्टॉरंटचा मेन्यू काय असेल, रेस्टॉरंटमधील वातावरण कसे असेल आणि ग्राहकांना सेवा कशी दिली जाईल, हे सर्व शेफ ऐमान नावाचे एक विशेष AI मॉडेल डिझाइन करेल.
रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, WOOHOO रेस्टॉरंटचे सह-संस्थापक अहमद ओटुन चाकिर यांनी दावा केला आहे की, शेफ ऐमान हे एक LLM आहे. AI आणि man या दोन शब्दांना जोडून हे नाव तयार करण्यात आले आहे. या AI मॉडेलला फूड सायन्समधील अनेक दशकांचे संशोधन, पदार्थांची मॉलिक्युलर रचना आणि जगभरातील 1 हजारपेक्षा जास्त पारंपारिक रेसिपींचा डेटा देऊन प्रशिक्षित करण्यात आले आहे.
शेफ ऐमानची निर्मिती करणाऱ्या तज्ज्ञांच्या मते, हा AI कोणत्याही खाद्यपदार्थाचे त्याच्या मूळ घटकांमध्ये विभाजन करतो, जसे की त्याचा टेक्सचर, आंबटपणा, गोडवा इत्यादी. त्यानंतर या घटकांना एकत्र करून तो पूर्णपणे नवीन आणि अनोख्या चवीचे पदार्थ तयार करतो. सुरुवातीला AI ने तयार केलेल्या रेसिपी मानवी शेफ चाखून पाहतात आणि गरजेनुसार त्यात बदल सुचवून ते पदार्थ आणखी चविष्ट बनवतात. या कामाचे नेतृत्व दुबईचे प्रसिद्ध शेफ रिफ ओथमान करत आहेत.





