एसटी बसमध्ये चालकाची आत्महत्या
संगमनेर,दि.२१ सप्टेंबर,(प्रतिनिधी) – एसटी बस चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर बस स्थानकात बसमध्येच ड्रायव्हरने आपलं आयुष्य संपवलं. पाथर्डी-नशिक (एम. एच. १४, बी. टी. ४८८७) या बसमध्ये याच बसच्या चालकाने संगमनेर बसस्थानकात उभ्या असलेल्या बसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. सुभाष तेलोरे (रा. कोल्हार कोलूबाईचे, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) असे या चालकाचे नाव आहे. कर्जबाजारीपणातून त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे.संगमनेर बस स्थानकात एसटी बसमध्येच चालकाने आत्महत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पाथर्डी-नाशिक बसच्या वाहन चालकाने बसमध्येच गळफास घेतला. पाथर्डी बस स्थानकातील चालक सुभाष तेलोरे यांनी आपलं आयुष्य संपवलं. मुक्कामी थांबलेल्या बसमध्येच त्यांनी सकाळी गळफास घेतल्याचा आरोप आहे.डोक्यावर कर्ज वाढल्याने सुभाष तेलोरे यांनी टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर बस स्थानकात डिझेल नसल्याने नाशिकला न जाता संगमनेरला बस मुक्कामी होती. मुक्कामी थांबलेल्या बसमध्येच त्यांनी सकाळी गळफास घेतला.




