एसटी : खुशबर; एसटी स्वस्ताच्या महागाई भत्ता ४ टक्क्यांनी वाढ

    155

    नगर : गणेशोत्सवाच्या (Ganesh festival) तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एसटी (ST) कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (dearness allowance) ३४ टक्क्यांवरुन ३८ टक्के करण्याच्या प्रस्तावावर आज मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली.

    सध्या राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतनासाठी शासनाकडून अर्थसहाय देण्यात येते. त्यामुळे महागाई भत्त्यामध्ये ४ टक्क्यांची वाढ झाल्याने सरकारवर ९ कोटी रुपयांचा बोजा पडेल. त्याचप्रमाणे असुधारित वेतन संरचनेतील राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना २०३ टक्क्यांवरून वाढवून २१२ टक्के महागाई भत्ता देण्यात येणार आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना माेठा दिलासा मिळणार आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here