एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड; महागाई भत्त्यात ५ टक्के वाढ -ॲड. अनिल परब यांची घोषणा

610

एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड; महागाई भत्त्यात ५ टक्के वाढ -ॲड. अनिल परब यांची घोषणा

– अधिकाऱ्यांना ५०००/- रूपये तर कर्मचाऱ्यांना २५००/- रूपये दिवाळी भेट मिळणार

– ऑक्टोबरचा पगार दिवाळीपूर्वी होणार.

परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी एसटी महामंडळाच्या अधिकारी-कर्मचारी वर्गाला दिवाळीची गोड भेट दिली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमिवर एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ५ टक्के वाढ करण्यात आली असून दिवाळीची भेट म्हणून अधिकाऱ्यांना ५०००/- रूपये तर कर्मचाऱ्यांना २५००/- रूपये देण्यात येणार असल्याची घोषणा मंत्री ॲड. परब यांनी केली.

▪️या निर्णयाचा लाभ महामंडळाच्या सुमारे ९३ हजारांहून अधिक कर्मचारी-अधिकाऱ्यांना होणार आहे. विशेष म्हणजे प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेला होणार पगार यंदा मात्र नोव्हेंबरच्या १ तारखेला म्हणजे दिवाळीपूर्वी होणार आहे.

•महागाई भत्त्यात वाढ करावी, अशी कर्मचाऱ्यांची मागणी होती. या मागणीला परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी सकारात्मक प्रतिसाद देत महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला. सध्या कर्मचाऱ्यांना १२ टक्के महागाई भत्ता मिळत आहे, त्यात आणखी ५ टक्के वाढ करण्याचा निर्णय मंत्री, ॲड. परब यांनी घेतला. त्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता १७ टक्के होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here