
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांची अमेरिकन इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टेस्लाने आज भारतात एंट्री केली आहे. जगातील तिसऱ्या सर्वात मोठ्या कार बाजारात टेस्लाने आपले पहिले शोरूम मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथे आजपासून सुरू केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या शोरूमचे उद्घाटन झाले. वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) हे ठिकाण मुंबईतील एक प्रमुख व्यावसायिक केंद्र आहे.भारत सरकारच्या नवीन धोरणानुसार, टेस्लाच्या कार भारतात खूप महाग असू शकतात. भारतात विकल्या जाणाऱ्या टेस्लाच्या गाड्यांवर सुमारे 70 टक्के आयात शुल्क लागेल. त्यामुळे, भारतात टेस्लाच्या इलेक्ट्रिक कारची सुरुवातीची किंमत अंदाजे 60 ते 65 लाख रुपये असू शकते.
टेस्लाने पहिल्या टप्प्यात भारतात त्यांची मॉडेल वाय ही कार लॉन्च केली आहे. या कारची ऑन रोड किंमत 61 लाख रुपये इतकी असणार आहे. या कारच्या रिअर-व्हील ड्राइव्ह व्हेरिएंटसाठी ग्राहकांना 59.89 लाख रुपये मोजावे लागतील, जगातील तिसऱ्या सर्वात मोठ्या कार बाजारात टेस्लाने आपले पहिले शोरूम मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथे आजपासून सुरू केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या शोरूमचे उद्घाटन झाले. वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) हे ठिकाण मुंबईतील एक प्रमुख व्यावसायिक केंद्र आहे.
भारत सरकारच्या नवीन धोरणानुसार, टेस्लाच्या कार भारतात खूप महाग असू शकतात. भारतात विकल्या जाणाऱ्या टेस्लाच्या गाड्यांवर सुमारे 70 टक्के आयात शुल्क लागेल. त्यामुळे, भारतात टेस्लाच्या इलेक्ट्रिक कारची सुरुवातीची किंमत अंदाजे 60 ते 65 लाख रुपये असू शकते.
टेस्लाने पहिल्या टप्प्यात भारतात त्यांची मॉडेल वाय ही कार लॉन्च केली आहे. या कारची ऑन रोड किंमत 61 लाख रुपये इतकी असणार आहे. या कारच्या रिअर-व्हील ड्राइव्ह व्हेरिएंटसाठी ग्राहकांना 59.89 लाख रुपये मोजावे लागतील, अशी माहिती रॉयटर्सने दिली आहे.
टेस्लाचे मॉडेल वाय हे सध्या जगातील सर्वाधिक विक्री होणारे इलेक्ट्रिक वाहन आहे. मुंबईनंतर टेस्ला आपले दुसरे शोरूम जुलैच्या अखेरीस दिल्लीत सुरू करणार आहे. त्यानंतर भारतात टेस्लाचा वेगाने विस्तार होईल. आता मुंबईसह भारतातील रस्त्यांवर टेस्लाच्या गाड्या धावताना दिसणार आहेत.





