‘एलसीबी’ ची कारवाई : विक्रीसाठी गावठी कट्टा घेऊन आलेल्या दोघांना ‘एलसीबी’ ने पकडले.
अहमदनगर – विक्री करण्याचे उद्देशाने गावठी कट्टा व जिवंत काडतूस घेऊन आलेल्या दोघा सराईत आरोपींना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. महेश काशिनाथ काळे (वय २५, रा. जामगांव, ता. गंगापुर, जि. औरंगाबाद), आण्णासाहेब शिवाजी कोल्हे (वय २१, रा. मुलानी वडगांव, ता. पैठण, जि. औरंगाबाद ) अशी पकडण्यात असलेल्यांची नावे आहेत.
नाशिक परिक्षेत्रचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील व जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील मनोज पाटील, श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. दिपाली काळे व शेवगांव उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल क
टके यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोसई सोपान गोरे, पोहेकाॅ भाऊसाहेब काळे, विजय बेठेकर, पोना ज्ञानेश्वर शिंदे, शंकर चौधरी, रविकिरण सोनटक्के, पोकॉ रोहिदास नवगिरे, संदीप दरदंले, मेघराज कोल्हे, चापोहेकाॅ बबन बेरड आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेले माहिती अशी की , अहमदनगर जिल्ह्यात गावठी कट्टे बाळगणारे व विक्री करणा-या गुन्हेगारांची माहिती घेत असतांना दि.३ डिसेंबर २०२१ रोजी पो.नि. अनिल कटके यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली, एक इसम अहमदनगर ते औरंगाबाद रोडवर, विजय हॉटेलचे समोर, प्रवरा संगम, ता. नेवासा येथे बेकायदेशिररित्या गावठी कट्टा कब्जात बाळगून विक्री करण्याचे करण्याचे उद्देशाने फिरत आहे. आता गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाली होती.
त्या अनुषंगाने पोनि श्री कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सूचना दिल्या. पथकाने मिळून दोन पंचासह खाजगी वाहनाने मिळालेल्या बातमीचे ठिकाणी प्रवरा संगम ( ता. नेवासा) येथे जावून सापळा लावला. माहितीनुसार इसमाचा शोध घेत असता विजय हॉटेलसमोर माहितीतील वर्णनाचा इसम व त्याचा साथीदार उभे राहून आजूबाजूस संशयीत नजरेने टेहळणी करीत असल्याचे दिसले. पोलीस पथकाची खात्री झाल्याने सर्वांनी त्यांना घेराव घालून ११ वा.चे सुमारास ताब्यात घेतले.
त्यांना पोलीसांनी पंच व पोलीस स्टाफची ओळख सांगून त्याचे नाव, पत्ता विचारले असता त्यांनी त्याचे नाव महेश काशिनाथ काळे व आण्णासाहेब शिवाजी कोल्हे असे असल्याचे सांगितले. त्यांना विश्वासात घेवून विचारपुस करुन, अंगझडती घेतली असता, त्यांचे अंगझडतीमध्ये आरोपी महेश काळे यांचे ताब्यातून एक स्टीलचा गावठी कट्टा, तीन जिंवत काडतुस व एक मोबाईल फोन व आरोपी आण्णासाहेब कोल्हे यांचे ताब्यातुन एक स्टीलचा गावठी कट्टा, तीन जिंवत काडतुस व एक मोबाईल फोन असा एकूण ९९ हजार २०० रु. किं. चा मुद्देमाल मिळून आल्याने तो जप्त करण्यात आला आहे.
याबाबत दोघांविरूद्धात दोन देशी बनावटीचे गावठी कट्टे व सहा जिवंत काडतूस विक्री करण्याचे उद्देशाने बेकायदेशिरित्या कब्जात बाळगताना मिळून आल्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोना ज्ञानेश्वर शिंदे यांच्या फिर्यादीवरून नेवासा पोलिस ठाण्यातगु.र.नं. ९२६/२०२१ आर्म अॅक्ट क ३/२५, ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
पुढील कार्यवाही नेवासा पोलिस करीत आहेत.