एमआयडीसी परिसरातील तोफखाना हद्दीत तीन ट्रक सुगंधी तंबाखूसह गुटखा जप्त: कोतवाली पोलिसांची कामगिरी
अहमदनगर- शहरातील एमआयडीसी परिसरातील तोफखाना हद्दीत तीन ट्रक सुगंधी तंबाखूसह गुटखा असा कोटीच्या आसपास मुद्देमाल पकडण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी कोतवालीच्या गुन्हे शोध पथकाने बुधवारी (दि.१६) सायंकाळी ८.30 वाजण्याच्या आसपास केली आहे.
मुद्देमालाची मोठी व्याप्ती असल्याने कारवाई ही राञी उशिरापर्यंत सुरु होती.अहमदनगर शहरातील एमआयडीसी भागात छापा टाकून कोतवाली पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या कारवाई सुंगधी तंबाखूसह गुटखा पकडला आहे.
हा सर्व माल तीन ट्रकामधून आणल्याचे सूञाकडून समजते.कोतवाली पोलिसांना नगर शहरातील एमआयडीसी भागामध्ये लाखो रुपयांचा गुटखा लपून ठेवला असल्याची माहिती मिळाली होती.
कोतवाली पोलिसांनी एमआयडीसी भागातील तोफखाना पोलिस ठाणे हद्दीत असलेल्या एका गोडावूनवर छापा टाकून गुटखा जप्त केला आहे.
उशिरापर्यंत ही कारवाई सुरू असून गोडावूनमधून ट्रकमध्ये गुटखा भरण्याचे काम सध्या सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.



