
अहिल्यानगर : विद्यार्थीदशेपासूनच विद्यार्थ्यांमध्ये स्वंयशिस्त व एकता या गुणांची बीजे रोवण्यास मदत होण्याबरोबरच राष्ट्रीय छात्र सेनेमध्ये मिळालेले अनुभव व प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये विद्यालयीन जीवनापासूनच राष्ट्रभक्तीची गोडी निर्माण होण्यास मदत होते असे प्रतिपादन ले. कर्नल संजेशकुमार भवनानी यांनी केले. भारतीय स्वातंत्र दिनानिमित्त आदर्शगाव हिवरेबाजार मधील यशवंत माध्यमिक विद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना, १७महाराष्ट्र बटालियन एनसीसी विभागातर्फे ‘रँक डिस्ट्रीब्यूशन’ आणि ओनरेरी कॅप्टन भरत रघुनाथ ठाणगे यांच्या सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. हिवरेबाजार गाव जगभर प्रसिद्ध असून हिवरेबाजारच्या उपक्रमाचे सर्व जग पालन करते, असेही ते म्हणाले.
यावेळी पदमश्री डॉ. पोपटराव पवार, सुभेदार गोविंद मोकाशी, हवालदार विकास कारखिले हवालदार गोविंद सिंग, संचल भोजवानी, मिष्का भवनानी, सरपंच विमलताई ठाणगे, छबुराव ठाणगे, रामभाऊ चत्तर, राजू ठाणगे मेजर, मंगेश ठाणगे मेजर, दामोदर ठाणगे, अर्जुन पवार, बबन पाटील, अशोक गोहड, आनशाबापू ठाणगे, एस. टी. पादीर, रो. ना. पादीर, संजय पवार तसेच सर्व आजी माजी सैनिक, ग्रामस्थ, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ओनरेरी कॅप्टन भरत ठाणगे यांना ग्रामस्थामार्फत सन्मानपत्र आणि एनसीसी छात्रांना प्रेरणा मिळावी व त्यांच्याकडुन देशसेवा घडावी या हेतूने छात्रांना रँक देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी हर्ष मंगेश ठाणगे यास कंपनी सार्जंट मेजर, यश सुनील चारुडे यास कंपनी क्वार्टर मास्टर, संग्राम गोरक्ष वैराळ यास सार्जेन्ट तर तनुश्री पादीर, आर्यन बर्वे, श्रद्धा नाट श्रावणी वाबळे यांना कार्पोरल तसेच हुसेफ सय्यद, सुरज गिहे, प्रेरणा घोडके, धनश्री येवले, प्रतीक्षा भरत नाट, अनुष्का पोपट ढगे, तुषार पंडीत उरमुडे, कृष्णा मनोजकुमार उरमुडे या सर्वांना लान्स कार्पोरल रैंक प्रदान करण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मुरलीधर अमृते, दीपक ठाणगे, कैलास खैरे, सीटीओ नंदकुमार झावरे, नीता सोनवणे उपस्थित होते.